breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Chandrayaan-३ मोहिमेतील महत्वाच्या टप्प्याला आज मध्यरात्रीपासून होणार सुरूवात!

Chandrayaan-३ : चांद्रयान ३ मोहिमेतील एका महत्त्वाच्या टप्प्याला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. आज मध्यरात्री म्हणजे रात्री १२ ते एक च्या दरम्यान चांद्रयान ३ मधील इंजिन सुरु केले जाणार असल्यामुळे हे यान पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु करणार आहे. चांद्रयान ३ चे १४ जुलैला इस्रोच्या श्रीहरीकोटा या तळावरुन यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. तेव्हा चांद्रयानने १७३ किलोमीटर ते ४१ हजार ७६२ अशा लंबवर्तूळाकार कक्षेत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली.

पृथ्वीभोवती प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करतांना चंद्रयानचे इंजिन हे प्रज्वलित करण्यात येत होते आणि त्याची कक्षा वाढवण्यात येत होती. सध्या चांद्रयान हे २३६ किलोमीटर ते १ लाख २७  हजार ६०९ किलोमीटर या कक्षेत पृथ्वीला प्रदक्षणा घालत आहे. आज मध्यरात्री चांद्रयान ३ चे इंजिन २५ मिनीटांपेक्षा जास्त प्रज्वलित केले जाणार आहे. यामुळे चांद्रयानचा वेग हा 10 किलोमीटर प्रति सेकंद एवढा होईल आणि या वेगामुळे चांद्रयान ३ हे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने निघणार आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सेवानिवृत्त होणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांचा सत्कार

चंद्र आणि पृथ्वी दरम्यानचे सरासरी अंतर हे ३ लाख ८४ हजार किलोमीटर एवढं आहे. सध्या चांद्रयान हे पृथ्वीपासून १ लाख २७ हजार ६०९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तेव्हा यानाला चंद्राच्या कक्षेत पोहचायला आणखी दोन दिवस लागणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button