breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मोदींच्या कार्यकाळात देश काळोखात- रितेश तिवारी

चंद्रपूर |

केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. करोना साथरोग नियोजनात अपयश आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाची दररोज भाववाढ होत आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे अपयशी निर्णय घेतले. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरीविरोधात काळे कायदे करण्यात आले. मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मागील सात वर्षांत देशात काळोखच पसरला असल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात रविवारी कस्तुरबा चौकात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रितेश (रामू) तिवारी बोलत होते. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनीता लोढिया, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड. मलक शाकिर, उमाकांत धांडे, यांनी मनोगतातून केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी काळ्या रंगाचा मुखवटा असलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यावर केंद्र सरकारच्या अपयशाच्या विषयांचे फलक लावण्यात आले होते. प्रास्ताविक गोपाल अमृतकर यांनी, तर आभार एनएसयूआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button