breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Goa Election Results 2022: भाजपचे बंडखोर उत्पल पर्रिकर यांचा पराभव

पणजी  । प्रतिनिधी

गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा 800 मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

सुरुवातीच्या कलांमध्ये उत्पल पर्रिकर यांनी आघाडी घेतली होती. परंतु मतमोजणीच्या फेऱ्या जसजशा पुढे सरकू लागल्या तशा उत्पल पर्रिकर यांची पिछेहाट होऊ लागली. खरंतर उत्पल पर्रिकर यांनी भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी चांगली लढत दिली. परंतु मोन्सेरात यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली आणि विजय मिळवला.

उत्पल पर्रिकर यांची बंडखोरी का?
उत्पल यांचे वडील मनोहर पर्रिकर यांची या जागेवर मजबूत पकड होती. पर्रिकर येथून सहा वेळा आमदार होते. 1994 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1994, 2002, 2007, 2012 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये पर्रिकर यांना केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. मात्र, नंतर राज्यात सरकार स्थापनेत पेच निर्माण झाल्यावर पर्रिकर गोव्यात परतले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. पर्रिकर चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना त्यांच्या वडिलांच्या पारंपरिक जागेवर निवडणूक लढवायची होती. त्यामुळेच तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

बाबूश मोन्सेरात यांच्याबद्दल
बाबूश मोन्सेरात हे पाच वेळा आमदार आहेत. त्यांनी युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी (UGDP) कडून दोन वेळा आणि काँग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. अतानासिओ यांचा मुलगा रोहित हे पणजीचे महापौर आहेत. त्यांची पत्नी जेनिफर या देखील आमदार आणि राज्य सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत. मोन्सेरात 2002 पासून राजकारणात आहेत. मोन्सेरात हे रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायातही गुंतलेले आहेत. शिवाय त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button