breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, प्रत्येक दिंडीला मिळणार इतक्या हजारांचं अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : आषाढीच्या वारीसाठी राज्यभरातून दिंड्या पुण्यात दाखल होतात, आपल्या विठुरायाचा जयघोष करत चालत पंढरीच्या दिशने जातात. गावांगावांमधून वारकरी दिंड्यांमध्ये येतात, दिंड्यांमध्येच सर्व प्रमुख नियोजन पाहत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रूपयांचं अनुदान देण्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना ही आर्थिक मदत खूप फायद्याची ठरणार आहे. आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पुर्व नियोजनासाठी सह्याद्री राज्य अथितीगृहामध्ये बैठक झाली. त्यामध्ये हा घोषणा करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दौंडमधील कत्तलखान्याविषयी एक मागणी केली होती. दौंडमधील भीमा नदीच्या किनाऱ्यावर जो कत्तलखाना होणार होता तो कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. यंदाच्या वर्षीसुद्धा वारकऱ्यांना टोल माफ करण्यात आला आहे. बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाचं वारकरी प्रतिनिधींना टाळ वाजवत स्वागत केलं.

हेही वाचा – USA vs IRE: पावसामुळे सामना रद्द, पाकिस्तान ‘आऊट’, यूएसए Super 8 मध्ये

यंदाच्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करूयात, आषाढी वारी स्वच्छ. निर्मल आणि सुरक्षित व्हावी सरकारच्या सर्व विभागांनीही चांगली तयारी केली आहे. वारीवेळी जे अपघात होतात ते टाळण्यासाठी गृह विभागाला आदेश दिलेत. हे सरकार शेतकरी, वारकरी आणि सर्वसामन्यांचं आहे. आमच्या सरकारने खूप कमी वेळामध्ये शेतकरी महिला आणि तरूणांसाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आहेत. वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालायतून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे. आषाढ वारीतील वारकऱ्याचा दुर्देवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबीरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button