breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘…तर गंगा नदी हिंदू शववाहिनी होईल’, संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरत असून येथे लवकरच निवडणुका लागण्याच्या शक्यता आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी गंगा नदी हिंदू शववाहिनी होईल, असा घाणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी आजच्या सामना वृत्तपत्रात अग्रलेखातून मोदी-शहांच्या धोरणावर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशात कोरोनासंदर्भातील व्यवस्थापन कोसळले. त्यात पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन भाजपसाठी अडचणीचे ठरताना दिसत आहे. अशा वातावरणात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. गंगेत मृतदेह वाहत येत आहेत. कानपूरपासून पाटण्यापर्यंत गंगाकिनारी प्रेतांचे ढीग लागत आहेत. तेथेच त्यांचे दफन व दहन करावे लागत आहे. जगभरातील मीडियाने ही छायाचित्र छापल्याने भाजपच्या प्रतिमेस तडे गेले आहेत. ही बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी व उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी काय करायचे यासाठी मोदी-शाह कामाला लागले आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत गर्दी जमवून जी चूक केली तीच पुन्हा केंद्र सरकार करत आहे, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

हिंदुत्ववाद्यांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयूचा प्रवाह पाहून हिंदू समाजाचे रक्त तेव्हा उसळले होते. त्यातून केंद्रात भाजपची सत्ता आली. पण त्याच गंगेत आज हिंदूंचे बेवारस मृतदेह तरंगत आहेत. हे मृतदेहच भाजपला व त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांना पराभवाच्या लाटेकडे ढकलत आहेत. मोठा गाजावाजा करूनही पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. स्वत: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक होते. हिंदुत्वाच्या नावावर धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे टुलकिट अपयशी ठरले, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला  अपयश आल्याच्या टीकेची गंभीर दखल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) घेतल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांनी विचारमंथन सुरु केल्याचे सांगितले जाते. यासाठी नुकतीच दिल्लीत संघ आणि भाजपच्या नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीला संघाचे नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेते उपस्थित असल्याचे समजते.उत्तर प्रदेशात गंगेत शेकडो मृतदेह तरंगताना आढळल्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारची प्रतिमा मलीन झाली होती. तर राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारलाही कोरोना हाताळणीतील अपयशावरुन प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. यामुळे सरकार आणि पर्यायाने भाजपची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीरपणे पावले उचलायला सुरुवात केल्याचे समजते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button