पिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करणा-या दुचाकीस्वारांवर प्रशासन कारवाई करत आहे, वादावर लवकरच तोडगा निघेल

पार्थ पवार यांचे रिक्षा चालकांना शांतता राखण्याचे आवाहन

पिंपरी l प्रतिनिधी

पुनावळे येथे उबेर दुचाकी टॅक्सी चालकाला रिक्षा चालकांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी रिक्षा चालकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करणा-या दुचाकीस्वारांवर प्रशासन कारवाई करत आहे. या वादावर लवकरच तोडगा निघेल असेही पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

उबेरवरील दुचाकी टॅक्सी चालकाला रिक्षा चालकांनी पुनावळे येथे मारहाण केली. तसेच दुचाकी टॅक्सी चालकाचा मोबाईल त्याला फोडण्यास लावला. अंकुश कृष्णा सूर्यवंशी (वय 26, रा. साईनाथ कॉलनी, विनायक नगर, नवी सांगवी, मूळ रा. घाणव, ता. पाटण, जि. सातारा) हा तरुण मारहाणीत जखमी झाला. याप्रकरणी बाबुराव शामराव पांचाळ (वय 42), शरणबसप्पा शामराव पांचाळ (वय 36, दोघेही रा. कोयतेवस्ती, पुनावळे), हनुमंत बिभीषण माने (वय 23, रा. पुनावळे) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उबेर दुचाकीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय होत नसल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. ‘पुणे-पीसीएमसीमध्ये रिक्षाचालक व ‘बाईक-टॅक्सी’ मालकांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. कोरोना महामारीमुळे चालकांना त्रास झाला आहे, याची आम्हाला जाणीव आहे. बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारांवर प्रशासन कारवाई करत आहे. लवकरच या वादावर तोडगा निघेल, तुम्ही शांतता राखा’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button