breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

भाजपच्या महिला नेत्याने पक्ष सोडताच ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Chandrakant Khaire : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे. पाटील यांचा हा राजीनामा नांदेड भाजपसाठी मोठा धक्का आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. मी सूर्यकांता पाटील यांना एकदा प्रश्न विचारला होता की तुम्हाला भाजपमध्ये गेल्यानंतर कसं वाटतं. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या या ठिकाणी काहीच खरे नाहीये. परंतु त्या इतका वेळ त्या ठिकाणी का थांबल्या माहीत नाही. त्या इकडे आले असते तर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले असते. आता श्रीकांत पाटील यांना भाजप काय आहे हे समजलं आणि अजून अनेकांना समजेल आणि ते पण लोक हळूहळू भाजप सोडण्याचा प्रयत्न करतील, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

संदिपान भुमरे यांनी पालकमंत्री पदावर राहू नये. संदिपान भुमरे यांचं पालकमंत्री ठेवण्याचे कारण म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही सह्या केलेल्या आहेत. निधी वाटप केलेला आहे. त्या निधी वाटपाचा हिशोब आल्याशिवाय ते पालकमंत्री पद सोडणार नाहीत, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी भुमरेंवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Bhosari । समाविष्ट गावांतील पायाभूत सुविधांसाठी ‘कटिबद्ध’

ओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांनीही आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. महाराष्ट्रामध्ये जातीपातीचे राजकारण उफाळून आले आहे. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी ठीक नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातपात काढली नाही. माझी जातही कधी त्यांनी विचारली नाही. आपण सर्व मराठी आणि हिंदू आहोत ही भूमिका त्यांची होती. त्यामुळे शिवसेना वाढली. गुजरातमध्ये राहणारे गुजराती, बिहारमध्ये राहणारा बिहारी तसेच महाराष्ट्र मध्ये राहणारा मराठी असे बाळासाहेब यांचे मत होतं. उद्धव ठाकरे हे हि कधी जात-पात विचारत नाहीत, असं खैरे म्हणाले.

संभाजीनगरमध्ये जुन्या काळात मराठा समाजाला कुणबीच म्हणायचे. परंतु ते बाजूला केले. त्यांनी मराठा म्हणून सांगायला सुरुवात केली. जरांगे पाटील सकल मराठा समाजाला न्याय द्यायचं काम करत आहेत. मी त्यांना भेटून आलो आहे. ओबीसींना वाटते की मराठा समाज आपल्यामध्ये घुसल्यामुळे आपल्या लोकांना कमी फायदा मिळेल, हे सरकार तोडगा काढण्याऐवजी भांडणे लावत आहेत. हे भांडणे लावण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button