breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उदयनराजे आणि सुप्रिया सुळे श्रीमंत खासदार!

साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादीचे दोन खासदार राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत. तर १५ नवनिर्वाचित खासदारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

‘असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या संस्थेने राज्यातील  ४८ खासदारांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे याची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, ४८ पैकी २५ खासदारांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. यापैकी १५ जणांच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, धमकावणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या खासदारांमध्ये भाजपच्या २३ पैकी सहा, तर शिवसेनेच्या १८ पैकी पाच जणांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एमआयएमच्या प्रत्येकी एका खासदाराचा या श्रेणीत समावेश होतो.

राज्यातील श्रीमंत खासदारांची यादी

१९९ कोटी

उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) 

१४० कोटी

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)

१२७ कोटी

रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)

१०२ कोटी

श्रीरंग बारणे (शिवसेना)

६२ कोटी

सुनील मेंढे (भाजप)

४१ कोटी

कपिल पाटील (भाजप)

१८ कोटी

नितीन गडकरी (भाजप)

१२ कोटी

सुनील तटकरे (राष्ट्रवादी)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button