breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

जम्मू काश्मीरच्या पुलवामातील पिंगलानामध्ये दहशतवादी हल्ला; 1 पोलीस शहीद, एक CRPF जवान जखमी


। नवी दिल्ली । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला असून तर एक CRPF जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी पुलवामाच्या पिंगलाना येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका पार्टीवर गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. ज्यात दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. याच्या काही तासांपूर्वी शोपियानमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. ज्यात एक दहशतवादी मारला गेला. ही चकमक शोपियानच्या बस्कुचनमध्ये झाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव नसीर अहमद भट्ट असे असून तो नौपोरा बास्कुचन येथील रहिवासी आहे. हा दहशतवादी लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांचे एडीजीपी म्हणाले की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून दारूगोळा, पिस्तूल, एके रायफल्ससह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तो अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील होता आणि नुकताच तो एका चकमकीतून निसटला होता.

उमर अब्दुल्ला यांनी केले ट्विट
उमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल ट्विट करत लिहिले की, “या हल्ल्याचा निषेध करून आज कर्तव्य बजावताना ज्यांनी आपले प्राण दिले त्यांच्या कुटुंबीयांना मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी जखमी सीआरपीएफ जवान लवकरात लवकर बरं व्हावे यासाठी प्रार्थना करतो.

यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. काश्मीर झोनचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले होते की, दोन्ही स्थानिक दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. याशिवाय शोपियानमध्येही सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले होते, मात्र दहशतवादी फरार झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button