breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

उस्मानाबाद – महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून गेली कित्येक वर्ष मराठी- कानडी वाद सुरू आहे. शासकिय कार्यालयापेक्षा रस्त्यावर हा वाद जास्त पेटताना दिसतो. त्यामुळे सीमाभागात नेहमी तणावाचं वातावरण राहिलं आहे. या सर्व वादात शिवसेनेने नेहमी मराठीचा मुद्दा लावून धरत कर्नाटकला विरोध केला आहे. आता पुन्हा शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने सामने आल्याचं चित्र आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील कसगी येथे सीमेवर कर्नाटक पोलिसांनी सीमा तपासणी चेक नाके उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला स्थानिक शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला आहे. उमरगा मतदार संघाचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निर्देशानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आता सीमा भागात तणावाचं वातावरण तयार झालं आहे. तर गावकऱ्यांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण आहे.

शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी याबाबत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कर्नाटकच्या या अतिक्रमण प्रकरणाने आगामी काळात या भागात वाद पेटणार आहे. सीमेच्या लगत महाराष्ट्र हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते सीमा तपासणी नाके उभे केले आहेत, असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, सीमा नाके हे नेहमी आपआपल्या राज्याच्या महसुली भागात उभारले जातात. मात्र, कर्नाटक शासनाच्या वतीने या भागात नव्याने कायमस्वरूपी सीमा तपासणी नाके उभे करण्यात येणार असल्याची माहिती खासगी भागात पाहणी करताना गुलबर्गा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button