TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

 टीम इंडियाची मदार ‘या’ तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष

टीम इंडियाची T20 World Cupमध्ये कामगिरी चांगली असली तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या काही खेळाडूंवर मदार दिसून येत आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल त्यावर फायनलचे दरवाजे उघडणार आहेत. मात्र, तीन खेळाडूंवर खरी मदार ही टीम इंडियाची असणार आहे.

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T20 World Cup 2022 मध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी असली तरी प्रवास तसा खडतर आहे. टीम इंडियाचा गुरुवारी सेमीफायनलचा सामना होत आहे. न्यूझीलंडसोबत हा सामना असल्याने टीम इंडियासाठी ही लढत सोपी असणार नाही.  टीम इंडिया गेल्यावेळी T20 विश्वचषकाच्या गटातून बाहेर पडला होता. आता खरी मदार ही तीन खेळाडूंवर आहे. यामध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांचा खेळ चांगला राहिला आहे. त्यामुळे हेच खेळाडू टीम इंडियाला तारु शकतात, अशी चर्चा आहे.

टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली असून त्यात माजी कर्णधार विराट कोहली, मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचा मोठा वाटा आहे. आता हे तिघे टीम इंडियासाठी हुकमाचे एक्के ठरले आहेत. त्यांच्या खेळाच्या जोरावर टीम इंडिया इथंपर्यंत पोहोचली आहे.

कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड 

T20 World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून विराट कोहली ठरला आहे. विराटला गेल्या तीन वर्षांपासून चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले होते. मात्र, या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. या T20 विश्वचषकात कोहलीने आतापर्यंत सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 225 धावा केल्या आहेत. या दोघांनी आतापर्यंत समान 3-3 अर्धशतके झळकावली आहेत.

कोहलीने या विश्वचषकात पाकिस्तान (नाबाद 82), नेदरलँड्स (नाबाद 62) आणि बांग्लादेश (नाबाद 64) विरुद्धची तिन्ही अर्धशतके झळकावली आहेत. तर सूर्यकुमारने नेदरलँड (नाबाद 51), दक्षिण आफ्रिका (68 धावा) आणि झिम्बाब्वे (नाबाद 61) विरुद्ध ही अर्धशतके झळकावली आहेत.

अर्शदीप गोलंदाजीत अव्वल 

तसेच टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने गोलंदाजीत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सही गुडघे टेकताना दिसलेत. 23 वर्षीय अर्शदीपने या T20 World Cupच्या मोसमात आतापर्यंत 5 सामन्यांत 10 विकेट घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजांमध्ये तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. हार्दिक पांड्या हा अर्शदीपनंतरचा दुसरा भारतीय वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने पाच सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियाच्या या तीन खेळाडूंची कामगिरी

विराट कोहली

सामने : 5
धावा: 246
अर्धशतके : 3

सूर्यकुमार यादव

सामने: 5
धावा: 225
अर्धशतके : 3

अर्शदीप सिंग

सामने: 5
विकेट्स: 10

साठी टीम इंडिया

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक , हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button