ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बाटलीच्या काचेने अंगावर दहा वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी चिंचवड | बाटलीच्या काचेने अंगावर दहा वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या भांडणाच्या रागातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मारुंजी येथे शुक्रवारी (दि.18) दुपारी ही घटना घडली.

आलेख तिर्थनाथ प्रधान (वय 26) आणि रुपक तिर्थनाथ प्रधान (वय 24) (दोघेही रा. ओडीसा) असे अटक आरोपीचे नाव आहे. नारायण कृष्णा रेड्डी (वय 31, रा. मारुंजी मुळगाव आंध्र प्रदेश) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यशवंत नंदलाल चौधरी ( वय 33 ) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी यशवंत चौधरी यांच्या मानेवर तसेच शरिरावर इतर ठिकाणी बाटलीच्या काचेने व इतर धारदार शस्त्राने दहा वार केले. या हल्ल्यात यशवंत गंभीर जखमी झाले व बेशुद्ध पडले. फिर्यादी मरण पावले असे समजून आरोपींनी तिथून पळ काढला. हिंजवडी पोलिसांनी आरोपींनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button