पिंपरी / चिंचवड

आमदार लक्षण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सुरेली शाम लतादीदी के नाम’ कार्यक्रम

पिंपरी l प्रतिनिधी

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल नगर येथे पृथ्वीराज थिएटर्स व दया इंगळे प्रस्तुत “सूरेली शाम लतादीदी के नाम” हा श्रध्दांजली पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामध्ये मराठी व हिंदी जुनी व नविन लता मंगेशकर यांची गाणी घेण्यात आली. परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून दाद दिली.

या कार्यक्रमासाठी महापौर ऊषा ढोरे, प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख, विशालनगर, वाकड येथील नगरसेविका आरती चोंधे, पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत सुरेश चोंधे, युवा नेते नितिन इंगवले, युवा नेते गणेश कस्पटे, युवा नेते प्रसाद कस्पटे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमामध्ये गायिका मनिषा निश्चल, पौर्णिमा अदवंत, गायक वंडरबॉय पृथ्वीराज व सतिश इंगळे यांनी गायन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button