breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवारांबद्दल मोदींनी केलेल्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाल्या..

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीके केली. राज्यातील मोठे नेते केंद्रात कृषीमंत्री होते, पण त्यांनी शेतीसाठी काय केलं? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकतर मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रात आल्यावर ते शरद पवारांचं नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, कधी टीका करताना. राजकारणात एवढं तर चालतंच, इतना तो हक बनता है.

हेही वाचा – राजकीय नेत्यांच्या सभा उधळणार!

महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना मोदी नेहमीच नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. यावेळी मोदींनी कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला नाही, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button