ताज्या घडामोडीपुणे

पावसाळ्यात दुरुस्त केलेल्या खड्यांचा अहवाल सादर करा : अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पुणे  | शहर आणि उपनगरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू आहे. शहरात पावसाळ्यात दुरुस्त केलेल्या खड्ड्यांचा अहवाल, तसेच खर्चाची माहिती सादर करा, असे आदेश महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कुणाल खेमणार यांनी पथ तसेच ड्रेनेज विभाग विभागास दिले आहेत.

शहरात एका बाजूला खड्डे दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असला, तरी नेमक्‍या किती ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती केली याची कोणतीही माहिती ठेवण्यात आलेली नाही. केवळ किती डांबर आणि खडी वापरली, याचीच माहिती देण्यात आल्याने हे अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.

शहरात ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा योजनांच्या नावाखाली रस्ते खोदाई करण्यात आली आहे. त्यानंतर हे रस्ते पूर्ववत करणे आवश्‍यक असताना दोन्ही विभागांनी जेवढी खोदाई केली, तेवढेच रस्ते दुरुस्त केले. तर, पथ विभागानेही या दोन्ही विभागांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे सांगत जमेल तशी रस्ते दुरुस्ती केली होती, असे सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button