TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

वर्गमित्राकडून विद्यार्थिनी गर्भवती ; बलात्काराचा गुन्हा दाखल

नागपूर | कराटेचे प्रशिक्षण घेताना झालेल्या मैत्रीतून १७ वर्षाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जरीपटक्यात राहणारी १६ वर्षीय मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे. ती कराटे क्लासला जात होती. त्याच प्रशिक्षण केंद्रात सराव करणारा १७ वर्षीय आरोपी मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

सप्टेबर २०२१ मध्ये तिला अंबाझरीतील एका मित्राच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर दोघेही वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागले. यादरम्यान ती गर्भवती झाली. अल्पवयीन असलेल्या दोघांनाही गर्भपाताबाबत माहिती नव्हती. मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिच्या आईने रुग्णालयात नेल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे उघडकीस आले. विचारणा केली असता मुलीने प्रियकराचे नाव सांगितले. जरीपटका पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button