TOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय

देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांना दिली पद आणि गोपनीयतेची शपथ

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड जगदीप धनखड यांना दिली पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. हा शपथविधी सोहळा आज गुरुवारी दुपारी 12.30 वाजता पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना शपथ दिली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपला. त्यानंतर झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झाले. देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान झाले. यावेळी 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले

संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या 788 आहे. मात्र वरच्या सभागृहातील 8 जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी 780 खासदारचं मतदानास पात्र ठरले. या खासदारांच्या मतदानानंतरच्या निकालात एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विजयी उमेदवार म्हणून घोषित झाले. धनखड यांना 528 तर विरोधकांच्या उमेदवार अल्वा यांना केवळ 182 मते मिळाली. तर 15 मते बाद करण्यात आली. या उपराष्ट्रपती पदासाठी 92.94 टक्के मतदान झाले. दरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही एनजीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचेचा विजय झाला.

धनखड यांचा राजकीय प्रवास
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.1989 च्या लोकसभा निवडणुकीत ते झुंझुनूमधील खासदारकी जिंकले. त्यानंतर 1990 मध्ये त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री हे पद भूषवलं होत. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 1991 मध्ये धनकड यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडणून आले. यानंतर 2003 मध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. धनखड यांची जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

धनखड यांचा जीवनप्रवास
जगदीप धनखड हे मूळचे राज्यस्थानमधील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखड यांनी चित्तौडगड सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर भौतिकशास्त्रात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, ज्यानंतर राज्यस्थान विद्यापीठातून त्यांनी एलएलबी संपादन केली. धनकड हे क्रीडाप्रेमी म्हणूनही ओळखले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button