breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

#SSRCase: ड्रग केसमध्ये अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला अटक

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग केस प्रकरणी आणखी एक अटक केलेली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिच्या भावाला अटक झालेली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव गिसिलाओस असे आहे. हा मूळचा आफ्रिकेचा नागरिक आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी चौकशी सुरू असताना ड्रग प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सखोल चौकशी सुरू केली आहे. चौकशीत अनेकांना अटक झालेली आहे. अटकेतील काही जणांना सशर्त जामिनावर सोडण्यात आले तर काही जण अद्याप जेलमध्ये आहेत.

नार्कोटिक्सने गिसिलाओसला केलेली अटक ही या प्रकरणातील ताजी कारवाई आहे. सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीतून सुरू झालेल्या ड्रग केसमध्ये एका पेडलरने गिसिलाओस याचे नाव घेतले होते. या संदर्भात आणखी ठोस माहिती हाती आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. गिसिलाओस ड्रगचा पुरवठा करणाऱ्यांमध्ये अतिशय अॅक्टिव्ह आणि महत्त्वाचा दुवा आहे. याच कारणामुळे त्याला ठोस माहितीच्या आधारे अटक करण्यात आलेली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी गिसिलाओसला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गिसिलाओस थेट ड्रग पेडलरच्या संपर्कात होता. सुशांत आणि रिया ड्रग केसशी संबंधित एका पेडलरशी थेट संबंध असल्यामुळे गिसिलाओस याला अटक झालेली आहे. कोर्टाने त्याला दोन दिवसांची एनसीबी कोठडी दिलेली आहे. या कालावधीत आणखी चौकशी होणार आहे. याआधी एनसीबीने ठोस माहितीआधारे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर ड्रग जप्त केलेले आहे. एनसीबीने कोकेन, पीसीबी, एमडी अशी अनेक ड्रग जप्त केली आहे. ड्रगचा ९ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. या जप्तीनंतर गिसिलाओसला अटक झालेली आहे. जप्तीचा आणि त्याचा काही थेट संबंध आहे का, हे एनसीबीने अद्याप जाहीर केलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button