breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका वैद्यकीय विभागाचा सावळा-गोंधळ : आरोग्य सेविका भरती ऐनवेळी केली रद्द

पिंपरी । प्रतिनिधी

आरोग्य सेविका (एएनएम) यांची ‘वाॅक इन मुलाखती’द्वारे होणारी भरती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रशासकीय कारणास्तव अचानक रद्द केली. मात्र, ‘वाॅक इन मुलाखती’द्वारे होणारी भरती रद्द झाल्याची माहिती विद्यार्थिंनींना वेळेत मिळाली नाही. त्यामुळे राज्यभरातून आरोग्य सेविकेच्या भरतीसाठी आलेल्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे 16 व 17 मार्च होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द केल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी (दि.15 मार्च) सांयकाळी उशिरा माहिती दिल्याने हा गोंधळ उडाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) या रिक्त पदासांठी 7 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 16 व 17 मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केली होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संबंधित उमेदवारांना वेळेत मिळणे आवश्यक होती.

या ‘वाॅक इन मुलाखती’ द्वारे होणारी भरती रद्द झाल्याचे महिला, मुलींना माहिती नव्हते. राज्याच्या विविध भागातून आलेल्या मुली, महिलांनी आज (बुधवार) सकाळीच महापालिका भवन परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली. परंतू, आरोग्य सेविकेची भरती रद्द केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका वैद्यकीय विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे.

दरम्यान, वैद्यकीय विभागाने आरोग्य सेविकांची होणारी भरती (मंगळवार दि.16) रोजी दुपारी भरती रद्द करण्याची प्रशासकीय मान्यता घेतली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता माध्यमांना प्रेसनोट आणि महापालिका संकेतस्थळावर टाकण्यात आले. तसेच प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर फलक लावून भरती रद्द केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सोशल मीडियावर व्हाट्सऍपच्या विविध ग्रुपवर भरती रद्द केल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button