breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

श्रीलंकन क्रिकेटपटू कुमार संगाकारावर पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार

संगकाराला १०३ डिग्री सेल्सिअस इतका होता ताप
पुणे : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी ४ जानेवारी रोजी संध्याकाळी त्याचे अंग थरथर कापत असल्याने त्याला संध्याकाळी ८ वाजता हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. डिहायड्रेशन आणि उच्च तापाचा त्याला त्रास झाला होता. त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला.

घरीच डॉक्टरांना बोलावण्यात आले होते, जिथे त्याला थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि उच्च ताप आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ते डिहायड्रेट झाल्याचे आढळून आले होते. १०३ डिग्री सेल्सिअस ताप होता. आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतले. त्यांना पुन्हा हायड्रेट केले आणि इतर सहाय्यक उपचार दिले गेले. आणि ते विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले, असं रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले.

रुग्णालयातील वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्याने आभार मानले. रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन जात आहे आणि माझी प्रकृती पूर्ववत सुधारल्या बद्दल मी डॉक्टरांचा देखील आभार मानतो, असं संगकारा म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button