व्वा! भारताच्या नेमबाजाचा पदकी निशाणा, खात्यात आणखी एक मेडल
भारताचा नेमबाजपटू सिंहराज अधाना याने पुरुष 10 मीटर एअर रायफल पिस्टल प्रकारात आणखी एका पदकाची कमाई केलीये. मंगळवारी झालेल्या इवेंटमध्ये त्याने कांस्य पदकावर नाव कोरले. 216.8 गुणांसह त्याने हे पदक आपल्या नावावर केले. यापूर्वी महिला गटातील 10 मीटर रायफल इव्हेंटमध्ये गोल्डन कामगिरीची नोंद केली होती. या पदकासह भारताच्या खात्यात यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 8 पदक जमा झाली आहेत. यात 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकाचा समावेश आहे.
पात्रता फेरीत अव्वस्थानी असलेला भारताचा मनीष नरवाल याला फायनलमध्ये लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयश आले. तो सुरुवातीलाच पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात चीनच्या चाओ यांगने 237.9 गुण मिळवत पॅरालिंपिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. चीनच्याच जिंग हुआंग याने 237.5 गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. सिंहराज अदाना याने 10 शॉट्समध्ये 99.6 गुण प्राप्त करत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले.
P1 – Men's 10m air pistol SH1 went right down to the wire!
It's a stunning 1-2 for #CHN, as Chao Yang and Xing Huang take #Gold and #Silver, separated by just 0.4 🔫
Singhraj #IND completes the podium with #Bronze#Tokyo2020 #Paralympics #ShootingParaSport
— Paralympic Games (@Paralympics) August 31, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंहराज अदाना याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारताच्या आणखी एका नेमबाजाने आपल्यातील क्षमता दाखवून देत देशासाठी ब्राँझ पदकाची कमाई केली. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या अवस्मरणीय यशाबद्दल सिंहराज याचे खूप खूप अभिनंदन! अशा शब्दांत मोदींनी सिंहराजच्या कामगिरीला दाद दिली आहे.





