Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

जळगावहून पुण्याला एक्स्प्रेस हायवेने फक्त तीन तासांत पोहोचता येणार…!

जळगाव : पुणे-छत्रपती संभाजीनगर शहरांना जोडणारा अत्याधुनिक, एक्स्प्रेस हायवे (उच्चगती महामार्ग) उभारण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. प्रस्तावित महामार्ग पूर्ण झाल्यानंतर जळगावहून पुण्याला केवळ तीन तासांत पोहोचता येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख लाभणार आहेत.

महाराष्ट्राच्या दळणवळण सुविधेत क्रांतिकारक बदल घडवून आणणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा अत्याधुनिक, उच्चगती महामार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचण्यासाठी सहा ते साडेसहा तासांचा कालावधी लागतो. मात्र, प्रस्तावित उच्चगती महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर पुणे-छत्रपती संभाजीनगर अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. दुसरीकडे, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये जून महिन्यात झाला आहे.

हेही वाचा –  पुणे महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच, जळगावहून मुंबई आणि पुण्याला कमी वेळेत कसे पोहोचता येईल, यादृष्टीनेही नागपूरमधील बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार, सद्यःस्थितीत जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी अडीच तासांची कालावधी लागतो. हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अवघ्या एक तासावर आणण्याचे ठरले आहे. जळगाव-छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास एक तास आणि पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे उच्चगती महामार्गावरील प्रवासाचे दोन तास गृहीत धरले तर केवळ तीन तासांत जळगावहून पुण्याला पोहोचणे त्यामुळे शक्य होणार आहे.

पुणे-छत्रपती संभाजीनगर उच्चगती महामार्गासाठी सुमारे १६ हजार ३१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार असून, त्यामध्ये उच्च दर्जाचे रस्ते, आधुनिक पूल, उड्डाणपूल, सेवा रस्ते तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे केवळ दळणवळण सुलभ होणार नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. पुणे हे आयटी, शिक्षण आणि औद्योगिक केंद्र असून छत्रपती संभाजीनगर हा पर्यटन, औद्योगिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. या दोन्ही शहरांमधील थेट आणि जलद संपर्कामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन तसेच रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच जळगाव पर्यायाने खान्देशच्या विकासालाही गती मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button