कधी, किती वाजता, कोणत्या App आणि चॅनेलवर Live पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना?
![When, at what time, on which App and channel can India-Pakistan match be watched Live?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/India-Pakistan.jpg)
२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन करण्यात आलं असून सर्वच संघांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. या पंधराव्या आशियाचं आयोजन २०२० मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र करोनामुळे हे आयोजन दोन वर्षांनी पुढे ढकलण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये भारत विरुद्द पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामनाही पहायला मिळणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा हा सामाना नेमका कुठे आणि कसा पहता येईल यासंदर्भात अनेक क्रिकेट चाहते इंटरनेटवर माहिती शोधत असल्याचं दिसत आहे. या सामन्यासंदर्भातील हीच सर्व माहिती जाणून घेऊयात…
कधी आहे हा सामना?
भारत आणि पाकिस्तानचा सामना २८ ऑगस्ट रोजी म्हणजे स्पर्धा सुरु झाल्याच्या दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार आहे. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येईल. डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि अगदी स्मार्ट टीव्हीवरही डिस्ने-हॉटस्टार अॅपच्या माध्यमातून हा सामना पाहता येईल.
सामन्याची वेळ?
हा सामना दुबईमधील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता खेळवला जाईल. भारतामध्ये हा सामना सायंकाळी साडेसात वाजल्यापासून प्रेक्षकांना पाहता येईल.