breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरी टी-२० लढत! कुठे अन् किती वाजता?

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T२० सामना २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवून वर्ल्डकपचा वचपा काढला आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अशातच आता दुसरा सामना आज २६ नोव्हेंबर २०२३ ला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र २६ नोव्हेंबरला तिरुअनंतपुरममध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये आतापर्यंत केवळ ३ टी-२० सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ १ सामना जिंकला आहे, तर पाठलाग करणाऱ्या संघाने २ वेळा विजय मिळवला आहे.

भारताचा संभाव्य संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस , केन रिचर्डसन आणि अॅडम झाम्पा.

हेही वाचा  –  कोकणातील गृहिणी बनली मसाला क्वीन

कुठे व किती वाजता रंगणार सामना :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चुरशीची लढत ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम येथे खेळवली जाणार आहे. आज सायंकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे. मात्र सामना सुरु होण्याआधी अर्धा तास आधी नाणेफेक होईल.

सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चुरशीचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

प्रेक्षकांना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना Jio Cinema App वर पाहता येणार आहे.

टी-२० मालिकेचे उर्वरित वेळापत्रक ?

तिसरा सामना : २८ नोव्हेंबर २०२३, मंगळवार, बर्सापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
चौथा सामना : ०१ डिसेंबर २०२३, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, रायपूर
पाचवा सामना : ०३ डिसेंबर २०२३, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, बॅंगलोर.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button