IPL 2024 | राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यात ‘या’ संघाचं वर्चस्व राहणार
![This team will dominate in Rajasthan vs Hyderabad match](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/SRH-vs-RR-780x470.jpg)
SRH vs RR | आयपीएल २०२४ चा दुसरा क्वालिफायर सामना आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. गुणतालिकेत SRH दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे क्वालिफायर १ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धचा पराभव होऊनही त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची दुसरी संधी मिळाली आहे.
SRH विरुद्ध RR हेड टू हेड :
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ आतापर्यंत १९ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी SRH १० वेळा जिंकले आहेत आणि ९ वेळा आरआर जिंकले आहेत.
हेही वाचा – ‘१९७१ मध्ये पंतप्रधान असतो तर..’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
हैदराबाद आणि राजस्थान आयपीएल २०२४ मध्ये फक्त एकदाच आमनेसामने आले होते, ज्यामध्ये SRH ने प्रथम खेळताना २०१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ २०० धावा करता आल्या आणि सामना एका धावेने गमावला आहे.