ऑस्ट्रेलियाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज; स्टेडियमचा पिच रिपोर्ट काय?
![The five-match T20 series between India and Australia begins](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Ind-vs-Aus-780x470.jpg)
IND vs AUS T20 : आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये पाच सामन्याची टी २० मालिका सुरु होणार आहे. पहिला सामना आज (२३ नोव्हेंबर २०२३) विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादववर सोपवण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाडवर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
स्टेडियमचा पिच रिपोर्ट काय आहे?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना विशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्टेडियम पिचचाविचार केला तर हि खेळपट्टी संतुलित आहे. अभ्यासानुसार या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच म्हणजे सॅम प्रमाणात मदत मिळते. त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांनाही खेळपट्टीवर चांगली कामगिरी होते. त्याशिवाय राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे देखील चांगले आहे कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ६७ टक्के सामने जिंकले आहेत.
हेही वाचा – धनगर समाजाच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सामन्याची वेळ आणि प्रक्षेपण :
सायं. ७ वा.
थेट स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.
संभाव्य भारतीय संघ :
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया संघ :
मॅथ्यू वेड (कर्णधार), आरोन हार्डी, जेसन बेहरनडोर्फ, सीन अॅबट, टिम डेव्हिड, नेथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा.