breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धनगर समाजाच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

आरक्षणासह अनेक मागण्यांचा समावेश

पिंपरी : धनगर आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निगडी तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनातन ही मागणी करण्यात आली आहे.

या वेळी राजू दुर्गे, गणेश खरात, निखिल पडळकर, रणजित हप्ते, मारुती खडके, संतोष रुपनवर, सागर थोरात, तुकाराम घुंडरे, दिगंबर घुंडरे, राहुल मदने, केशव मदने, दिपक भोजने यांच्यासह आदीसह धनगर समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा. आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्राच्या वतीने धनगर आरक्षणाकरीता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत वकील कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करा. न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करा.

हेही वाचा – रोहित, विराटने मागितली भारतीयांची माफी; व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय? 

मेंढपाळांसाठी घोषीत केलेल्या १० हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकर सहकार महामंडळाची घोषणा करावी. त्याद्वारे योजना कार्यान्वीत कराव्यात. स्वतंत्र अध्यक्षाची नेमणूक करा. ज्या योजना राबविल्या नाहीत त्याचा आढावा घ्या. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले थांबवून स्वतंत्र कायद्याची तरतूद करावी. महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिक प्रती हेक्टर एक रुपया दर आकारणी करून स्थानिक मेढपाळांना वाटप करावे.

या बरोबरच बिरोबा मंदिर देवस्थानाच्या आरेवाडी, हुलजंती, हुन्नुर, पट्टणकोडोली, वाशी या मुळ देवस्थानांच्या सर्वांगीण विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे. महाराज यशवंत होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावचा विकास आराखडा त्वरीत तयार करून त्याला मान्यता द्यावी. अहमदनगरचे नाव बदलून त्वरीत पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर करावे, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button