कसोटी सामन्यात भारताला तिसऱ्या दिवशी 359 धावांचं आव्हान
टीम इंडियासाठी हा मालिकेच्या दृष्टीने 'करो या मरो' सामना
दिल्ली : न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी दुसर्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी 359 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडचा दुसरा डाव हा 255 धावांवर आटोपला. तसेच किवींकडे 103 धावांची मोठी आघाडी होती. त्यामुळे आता भारताला जर सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत या धावा करणं भाग आहे. जिंकायचं असेल तर भारतीय फलंदांना प्रामुख्याने सलामी जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.





