ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर
अजिक्य रहाणेचे भारतीय संघात पुनरागमन

मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला इंग्लंडमध्ये ७ जुनपासून सुरूवात होणार आहे. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हा संघ आधीच पात्र झाला होता. ऑस्ट्रेलियाने संघ आधीच जाहीर केला होता. आता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाचे कर्णाधार पद सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात ७ जून ते ११ जून दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आहे. या संघात अजिक्य राहाणेने पुनरागमन केले आहे. तर दुखापतग्रस्त ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांना टीम इंडियात स्थान मिळालेले नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिक्य रहाणे, विराट कोहली, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर आश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकट.





