Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

डॉ. सुशांत पाटील ग्रुपतर्फे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

पुणे : डॉ. सुशांत पाटील ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. सुशांत पाटील सर आणि अ‍ॅड. अनुजा पाटील मॅडम यांचे दूरदर्शी नेतृत्व, मार्गदर्शन आणि भक्कम पाठिंबा लाभला. त्यांच्या प्रेरणेमुळे हा शिवजयंती उत्सव अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून Creative and Cultural Director प्रा. श्रेयस देशपांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व समन्वय केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विद्यानंद मानकर सर उपस्थित होते. तसेच मान्यवर पाहुणे आणि शिवव्याख्याते श्री. राहुल मारोती नलावडे उर्फ रायबा यांनी आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी संपूर्ण प्रेक्षकवर्ग भारावून गेला.

या कार्यक्रमासाठी सातत्याने मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे डॉ. सुरेश माळी सर, डॉ. सुरेश शिर्भादुरकर सर, डॉ. मेघना भिलारे मॅडम, श्री. प्रदीप खांडवे सर, श्री. संजय भोर सर, डॉ. योगेश गुरव सर, श्री. नामदेव वेताळे सर, डॉ. अल्पना अडसूळ मॅडम, डॉ. दिपन्निता मोंडल मॅडम, प्रा. योगेश नागवेकर सर तसेच सर्व विभागप्रमुख आणि Cultural Committee Heads यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

हेही वाचा –  महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा; महिला आयोगाच्या कार्यक्रमात काय म्हणाल्या?

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देखावे सजावट समितीत प्रा. संदेश पाटील, प्रा. चैत्राली सरतापे आणि प्रा. सतीश असणे यांनी काम पाहिले. नाटक, पोवाडा व भाषण समितीमध्ये डॉ. प्रवीण लाटणे, प्रा. स्वप्नील मोरे आणि प्रा. महेश लोहार यांनी समन्वय साधला. कला दालन (Art Gallery) प्रा. प्रियंका भिक्कड आणि प्रा. अनुराधा बोबडे यांनी साकारले. शिवजयंती रॅली समितीत श्री. किरण माळी, श्री. अतुल धुमाळ आणि श्री. विठ्ठल राऊत यांनी काम केले. शिवअभिषेक समितीत श्री. सिद्धेश जाधव आणि श्री. सच्चितानंद श्रीगंधे यांचा सहभाग होता. स्टेज समिती (Technical Campus) प्रा. भावना शिंदे यांनी पाहिली. क्रीडा समितीत श्री. किरण माळी आणि पूनम अभंग यांनी काम केले. आतिथ्य (Hospitality) समितीत प्रा. राजहिंदवी साठे आणि प्रा. मधुरा मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली.

मीडिया टीम आणि डेकोरेशनचे काम उन्मेष कोरडे आणि मंगेश ढोले यांनी केले. सोशल मीडिया समन्वयक म्हणून निखिल लाडे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेले आरंभ ढोल-ताशा पथक आणि त्यांचे प्रमुख समन्वयक सिद्धू सर यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची जिवंत झलक प्रेक्षकांसमोर उभी केली.

कार्यक्रमाच्या यशामागे विद्यार्थ्यांचेही मोठे योगदान राहिले. स्वयंसेवक म्हणून प्रणव चिंधे, स्नेहा चव्हाण, हर्षाली पवार, सार्थक, देवा निंबाळकर, कपिश केदारी, यश दोमसे, शिवम लहसे आणि स्वानंद जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल खीचर आणि प्रफुल्ल चव्हाण यांनी प्रभावीपणे केले.

तसेच मंचावर भाषण, नाटक, नृत्य सादर करणारे विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार करणारे विद्यार्थी तसेच चित्रकला, स्केचेस, पेंटिंग्स आणि रांगोळी सादर करणाऱ्या सर्व कलावंत विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये हाऊसकीपिंग स्टाफ आणि शिपाई वर्गाचेही मोलाचे योगदान राहिले.

सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा शिवजयंती उत्सव अत्यंत भव्य, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.

जय भवानी! जय शिवाजी!

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button