Women’s World Cup 2023 : भारतीय संघाने गाठली सेमी फायनल; आयर्लंड संघाचा ५ धावांनी पराभव
भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार?
women’s world cup : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील १८ सामना भारत विरूद्ध आयर्लंड संघात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहून उपात्यं फेरीत पोहोचला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या. भारतीय संघाची फलंदाज स्मृती मंधानाने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार लगावत ८७ धावांची दमदार खेळी केली. त्याचबरोबर शफाली वर्मा हिनेही २९ चेंडूत २४ धावांची खेळी केली. तर आयर्लंड संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार लॉरा डेलेनीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
आयर्लंड संघाने १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ८ षटकांत दोन गडी गमावत ५४ धावा केल्या. पावसामुळे सामना थांबवण्यात आला. ज्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड संघ भारतीय संघाच्या ५ धावांनी मागे होता. याचाच फटका आयर्लंड संघाला बसला. अशा पद्धतीने भारतीय संघ उपात्यं फेरीत पोहोचला.
भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहून उपात्यं फेरीत पोहोचला तर, भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आतापर्यंत अ गटातील चारपैकी चार सामने ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहेत. पहिला उपात्यं सामना २३ फेब्रुवारीला तर दुसरा उपात्य सामना २४ फेब्रुवारीला होणार आहे. तर अंतिम सामना केपटाऊनमध्ये २६ फेब्रुवारीला होणार आहे.