टी-२० विश्वचषक महासंग्राम वेळापत्रक जारी; जाणून घ्या टीम इंडियाच्या सामन्याबद्दलची माहिती
![T20 World Cup schedule released; Know Team India match information](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/T-20-World-Cup-2024-780x470.jpg)
T-20 World Cup 2024 | क्रीडा चाहत्यांच्या नजरा टी-२० विश्वचषकाकडे लागल्या आहेत. २ जून पासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. विश्वचषकात यंदा २० संघ सहभागी होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया ग्रुप अ मध्ये आहे.
टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक :
पहिला सामना ५ जून, बुधवार : भारत विरुद्ध आयरलँड – नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
दूसरा सामना ९ जून, रविवार : भारत विरुद्ध पाकिस्तान – नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
हेही वाचा – दहावीनंतर उत्तम करिअर करायचंय? तर हे कोर्स करा; मिळेल लवकरात लवकर नोकरी
तिसरा सामना १२ जून बुधवार : भारत विरुद्ध अमेरिका – नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
चौथा सामना १५ जून, शनिवार : भारत विरुद्ध कॅनाडा – सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा.
टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचे शिलेदार :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.