सूर्या-हार्दिक रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी खेळणार
मुंबई टीममध्ये या दोघांना संधी ,हा सामना चौधरी बन्सी लाल क्रिकेट स्टेडियम येथे होणार
![Surya, Hardik Ranji, Sports, Mumbai, Sandhi, Samana, Chaudhary Bansi Lal, Cricket,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/surya--780x470.jpg)
मुंबई : इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i मालिकेतील विजयी घोडदौड कायम राखली. टीम इंडियाने 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. सूर्यकुमार यादवला या मालिकेत फलंदाज म्हणून काही खास करता आलं नाही. मात्र सूर्याने कर्णधार म्हणून आपला धमाका कायम राखण्यात यश मिळवलं. तर दुसऱ्या बाजूला शिवम दुबे याने बॅटिंगसह बॉलिंगनेही धमाकेदार कामिगरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाचे हे दोघेही खेळाडू आता रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी खेळणार आहे. मुंबई क्रिकेट टीम रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत हरयाणाविरुद्ध भिडणार आहेत. मुंबई टीममध्ये या दोघांना संधी देण्यात आली आहे.
मुंबई विरुद्ध हरयाणा यांच्यातील उपांत्य पूर्व फेरीतील सामना हा 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा सामना चौधरी बन्सी लाल क्रिकेट स्टेडियम येथे होणार असल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात आली. मात्र त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. या सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. अशात या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र बीसीसीआयने या मागचं कारण काय? हे सांगितलेलं नाही.
हेही वाचा : ‘नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीत ८८ कोटींचा घोटाळा’; अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
लाहलीमध्ये आयोजित सामना हा आता ठिकाण बदलल्यानंतर कोलकाता येथे होणार असल्याची माहिती मिळत आहे. बीसीसीआय डेव्हलपमेंट मॅनेजर अबय कुरुविला यांनी याबाबतची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि हरयाणा क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.
सामन्याचं ठिकाण बदलण्याचं कारण काय?
एमसीए अधिकाऱ्यांनुसार क्वार्टर फायनल मॅचचं ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती त्यांना मेलद्वारे मिळाली.अपरिहार्य कारणामुळे सामन्याचं ठिकाण बदलण्याचं आल्याचं म्हटलं आहे. आता हा सामना ईडन गार्डमध्ये होणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून या सामन्याचं आयोजन करण्यात येणार आहे.
रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलसाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दूल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉस्टन डायास, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा