क्रीडा विश्व : पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने संघाची लाज काढली… काय म्हणाला वाचा!
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे टीम पाकिस्तान टीकेचे लक्ष्य
नवी दिल्ली : पाकिस्तानचा अफगाणिस्तानने लालीरवाणा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम चांगलाच भडकला आहे. अक्रमने तर यावेळी फक्त एका वाक्यात पाकिस्तानच्या संघाची लाज काढली आहे.
अक्रम यावेळी म्हणाला की, ” पाकिस्तानचा संघ फारच वाईट खेळला. अफागणिस्तनच्या संघाने २८० धावांपर्यंत पोहोचताना फक्त दोनच विकेट्स गमावल्या होत्या, यावरून सर्व काही स्षष्ट होत आहे. फक्त दोन विकेट्सवर त्यांनी एवढी मजल मारली, ही खरंच मोठी गोष्ट आहे. तुम्ही पाकिस्तानची फिल्डिंग पाहिली आहे का, एकही खेळाडू फिट दिसत नाही. वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून गेल्या तीन आठवड्यात एकाही पाकिस्तानच्या खेळाडूची फिटनेस टेस्ट झाल्याचे वाटत नाही. गेल्या दोन वर्षांत त्यांची किती वेळ फिटनेस टेस्ट झाली हे त्यांनी सांगयला हवे. पाकिस्तानचे खेळाडू रोज आठ किले मटण खातात पण तरीही त्यांचा फिटनेस चांगला नाही. मी नावं घेत नाही, नाही तर त्यांची मान अजून लाजेने खाली जाईल.”
अक्रमने यावेळी एका वाक्यात पाकिस्तानच्या खेळाडूंची लाज काढली आहे. वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून जर पाकिस्तानच्या खेळाडूंचा फिटनेस पाहिला गेले नसेल तर ती फारच वाईट गोष्ट आहे. कारण वर्ल्ड कप ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. पाकिस्तानच्या संघाला सारे काही मिळत आहे. त्यांच्या मानधनातही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने भरघोस वाढ केली आहे. पण वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या कामगिरीत मात्र सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळेच वसिम अक्रम पाकिस्तानच्या संघावर भडकला आहे. अक्रमने यावेळी पराभवानंतर योग्य जागी बोट ठेववत त्यांची नेमकी काय चूक होत आहे, ते यावेळी दाखवून दिले आहे.





