Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

Shreyas Iyer Fined: श्रेयस अय्यरला ‘ती’ चूक नडली! सामना जिंकल्यानंतर BCCI ने केली मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Shreyas Iyer Fined By BCCI: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना होता. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६३ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना, कुपर कॉनोलीने दमदार अर्धशतकी खेळी करून पंजाबला आपला पहिला विजय मिळवून दिला. हा सामना जिंकूनही पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरवर कारवाई करण्यात आली आहे.

पंजाब किंग्ज संघाने हा सामना जिंकून गुणतालिकेत खातं तर उघडलं आहे, पण निर्धारीत षटकं वेळेत पूर्ण न केल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमानुसार, २० षटकांचा खेळ वेळेन पूर्ण होऊ शकला नाही, तर स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधारावर १२ लाखांचा दंड आकारला जातो. हा सामना मुल्लानपूरच्या न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. हा गुन्हा आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम २.२२ अंतर्गत , जे स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे.

हेही वाचा –  यंदाच्या उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ ईम्युनिटी शॉट्स…..

श्रेयस अय्यरकडून ही चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या हंगामात श्रेयस अय्यरने २ वेळा ही चूक केली होती. पहिल्यांदा अशी चूक केल्यास १२ लाखांचा दंड आकारला जातो. तर दुसऱ्यांदा चूक केल्यास २४ लाखांचा दंड आकारला जातो. तिसऱ्यांदा अशी चूक केल्यास दंडासह एक सामना खेळण्यावर बंदी घातली जाते. पंजाब किंग्जचा संघ निर्धारीत वेळेत २० वे षटक सुरू करू शकला नव्हता. त्यामुळे शेवटच्या षटकात ५ ऐवजी ४ खेळाडूंना ३० यार्डच्या बाहेर ठेवावं लागलं. श्रेयस अय्यरकडून या हंगामात पहिल्यांदाच अशी चूक झाली आहे. त्यामुळे १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. पुढील सामन्यांमध्ये जर दुसऱ्यांदा अशी चूक झाली, तर दंडाची दुप्पट रक्कम म्हणजे २४ लाख रुपये द्यावे लागतील.

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथण फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने ३८ धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्सने २५ धावा केल्या. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने ६ गडी बाद १६२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कुपर कॉनोलीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने ३७ धावांची खेळी केली. हा सामना पंजाब किंग्जने ३ गडी राखून आपल्या नावावर केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button