breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघाच्या फलंदाजीवर शोएब अख्तरचे सूचक विधान; म्हणाला..

World Cup 2023 : भारतीय संघाने विश्वचषकातील पाचही सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठं विधान केलं आहे.

शोएब अख्तर म्हणाला, विराट एक असा व्यक्ती आहे जो दबावातही उत्तम खेळ करतो. दबाव हा त्याच्यासाठी एक संधी असते. ती संधी म्हणजे शतक ठोकणे, विजयी खेळी खेळणे आणि इस्टाग्रामवर अधिक फॉलोअर्स वाढवणे. हे सगळं तो करू शकतोस कारण तो त्यास पात्र आहे. शुबमन गिल हा न्यूझीलंड संघासाठी एकटा पुरेसा आहे. जर रोहित शर्मा खराब फटका मारून बाद झाला नसता तर त्यानेच संघाला जिंकवून दिले असते. जर के.एल. राहुल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळायला आला तर विरोधी संघाला तो एकटाच भारी पडू शकतो.

हेही वाचा – ‘मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना अटक झाली पाहिजे’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान 

भारताला हरवणे हे एवढे सोपे नाही कारण त्यांची फलंदाजी खूप मोठी आहे. कोहलीने आज काय केले हे सर्वांना माहीत आहे, पण राहुलनेही त्याचा भार उचलला आहे. जर तो बाद झाला नसता तर सूर्यकुमारनेही तेच केले असते. याशिवाय शोएबने मोहम्मद शमीचेही कौतुक केले, असं शोएब अख्तर म्हणाला.

न्यूझीलंडला ३००-३५० धावा करू दिल्या नाहीत यात मोहम्मद शमीची मोठी भूमिका खूप मोलाची होती. तो थोडा महागडा ठरला, पण ते ठीक आहे कारण त्याने पाच फलंदाजांना बाद केले. भारताला त्याच गोलंदाजी कॉम्बिनेशनवर टिकून राहण्याची गरज आहे. त्यांच्याकडे समतोल फलंदाजी आणि गोलंदाजी कॉम्बिनेशन आहे. भारत विश्वचषक जिंकणार नाही असा कोणताही मार्ग नाही, असंही शोएब अख्तर म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button