क्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

शाहरुखचे बीसीसीआयला थेट चॅलेंज

केकेआरने आयपीएल जिंकली

नवी दिल्ली : केकेआरने आयपीएल जिंकली. शाहरुख खानचे स्वप्न साकारल झाले. पण आता शाहरुखने बीसीसीआयशी थेट पंगा घेतल्याचे समोर आले आहे. केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खान हा केकेआरच्या संघाबरोबर सेलिब्रेशन करत होता. हे सेलिब्रेशन करत असताना शाहरुखने थेट बीसीसीआयशी पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले.

शाहरुख खानने केकेआरच्या विजयानंतर कसं केलं सेलिब्रेशन…
केकेआरने विजय साकारला आणि शाहरुख मैदानात आला. शाहरुख केकेआरच्या खेळाडूंना भेटला. गौतम गंभीरला त्याने आलिंगन दिलं. डोक्यावर पापी दिली. त्यानंतर शाहरुख हा मैदानात फेरी मारण्यासाठी निघाला. यावेळी तो चाहत्यांचे अभिवादन स्विकारत होता. शाहरुख मैदानात सर्वत्र फिरला. त्यानंतर तो संघाबरोबर उभा राहीला. जेव्हा केकेआरला ट्रॉफी देण्यात आली, तेव्हा शाहरुखने ही आक्षेपार्ह गोष्ट केली.

शाहरुखने कसा घेतला बीसीसीआयशी पंगा…
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने ट्रॉफी स्विकारली. त्यानंतर त्याने खेळाडूंनी ट्रॉफीबरोबर पोझ देण्यासाठी बोलावले. फोटो शूट झाल्यावर ही ट्रॉफी गेली ती शाहरुखच्या हातामध्ये. शाहरुखने सुरुवातीला ही ट्रॉफी उंचावली. त्यानंतर शाहरुखने सर्वांना फ्लँक किस देण्याची पोझ करायला सांगतली आणि तिथेच त्याने बीसीसीआयवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. बीसीसीआयशी शाहरुखने यावेळी थेट दोन हात केले. पण शाहरुखने हे असं का केलं, याचं कारण आता समोर आले आहे.

शाहरुखने केकेआरला खास पोझ देण्यासाठी का सांगितलं…
जर तुम्ही संपूर्ण आयपीएल पाहिली असेल तर केकेआरच्या संघावर बंदी आणली गेली होती. हा खेळाडू होता हर्षित राणा. राणाने मयांक अगरवालला बाद केल्यावर फ्लाइंग किस दिला होता. त्यानंतर त्याला ताकिद देण्यात आली होती. त्याच्यावर दंड ठोठावला. पण त्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात जेव्हा राणाने विकेट मिळवली तेव्हा त्याने तीच कृती केली. त्यामुळे राणावर एका सामन्याची बंदी घालण्याचा निर्णय हा बीसीसीआयने घेतला होता. ही गोष्ट कुठेतरी शाहरुखच्या मनात सलत होती आणि केकेआरच्या विजेतेपदानंतर ती गोष्ट बाहेर आली. शाहरुखने ट्रॉफी हातात घेतल्यावर संपूर्ण संघाला फ्लाइंग किस द्यायला लावला आणि तिथेच त्याने बीसीसीआयशी थेट पंगा घेतला. आमच्या एका खेळाडूवर तुम्ही बंदी आणली, आता आम्ही सर्वच ती कृती करतोय, आता काय कराल, असे थेट आव्हान शाहरुखने आपल्या कृतीच्या जोरावर बीसीसीआयला दिले.

शाहरुख खानने आता बीसीसीआयशी पंगा घेतला आहे. दुसरीकडे बीसीसीआय केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरला प्रशिक्षक बनवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे ही सर्व चक्र आता कशी फिरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे या सर्व प्रकरणानंतर बीसीसीआय गंभीरला प्रशिक्षक करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. पण बीसीसीआय शाहरुखवर काही कारवाई करणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button