क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

सचिन तेंडुलकर लॉर्ड्सवर कायमस्वरूपी

लॉर्ड्सवर मिळाला इतका मोठा मान, शिरपेचात एक मानाचा तुरा

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची कामगिरी अद्यापही स्मरणात आहेत. आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण सचिन तेंडुलकर कायमचा लॉर्ड्सवर दिसणार आहे. सचिन तेंडुलकरने अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेदरम्यान लॉर्ड्सवर त्याच्या तैलचित्राचे उद्घाटन केले. यावेळी एमसीसीचे अध्यक्ष मार्क निकोलस यांची उपस्थिती होती.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन

सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. पण लॉर्ड्सवर त्याच्या नावावर एकही शतक नाही. त्यामुळे त्याचं नाव सन्मान फलकावर नाही. पण आता स्टेडियमच्या भिंतीवर कायमस्वरुपी दिसणार आहे. सचिन तेंडुलकरने कसोटी कारकि‍र्दीत लॉर्ड्सवर पाच कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 21.66 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत. लॉर्ड्स मैदानात सचिन तेंडुलकर याच्या आधी लॉर्ड्स मैदानाच्या भिंतीवर शेन वॉर्नचं चित्र लावण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button