ठरलं तर मग! ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार?
![Rituraj Gaikwad will get married soon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Ruturaj-Gaikwad-780x470.jpg)
Ruturaj Gaikwad Marriage : आयपीएलच्या हंगामातील महाअंतिम सोहळा आज रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध गुजरात टायटन्समध्ये हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई संघाला फलंदाज ऋतुराज गायकवाड आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
ऋतुराज गायकवाड लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या आधी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळणार नाही. येत्या ३ ते ४ जूनदरम्यान ऋतुराज लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा – एसटीच्या अधिकृत थांब्यावर मिळणार फक्त ३० रूपयांत नाश्ता
ऋतुराज गायकवाडने आम्हाला त्याच्या लग्नाबाबत कळवलं होतं. लग्नामुळे मला लंडनला लवकर निघता येणार नाही. पण मी ५ जूननंतर टीमबरोबर सहभागी होईन, असं ऋतुराजने सांगितले होते. त्यामुळे कोच राहुल द्रविड यांनी ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची मागणी केली होती. यानुसार ऋतुराजच्या जागी यशस्वी जायस्वालचा समावेश संघात केला जाणार आहे, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिला आहे.