राहुलचा शतकी तडाखा, भारताचं इंग्लंडला 337 धावांचं आव्हान
पुणे – तीन सामन्यांच्या मालिकेतील दिसरा एकदिवसीय सामना चालू आहे. दुसऱ्या सामन्यात पाहुणा संघ इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातील त्यांचा हा निर्णय त्यांच्या फायद्याचा ठरला असं वाटत होतं. भारताचे दोन्ही सलामीवर स्वस्तात परतले. मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि के. एल. राहुलने केलेली महत्त्वपुर्ण भागीदारीमुळे भारताची गाडी पुन्हा रूळावर आली.
विराट कोहलीनं राहुल सोबत शतकी भागीदारी करत डाव सावरला. कोहली 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंतने आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि धावांची गती वाढवली. अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्यानं सात षटकार आणि तीन चौकारांसह आपली खेळी साकारली. तर पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या राहुलने शतकी खेळी केली. 114 चेंडूत 108 धावा केल्या. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार लगावले.
अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही छोटेखानी आक्रमक खेळी केली. चार षटकारांसह 16 चेंडूत 35 धावा ठोकल्या तर त्याचा बंधू क्रुणाल पांड्यानंही 12 धावांचं योगदान दिलं.दरम्यान, इंग्लंड संघाला विजयासाठी मोठ्या खेळी करण्याची गरज आहे. सध्या इंग्लंड संघाने फलंदाजीला सुरूवात केली असून 40 धावा केल्या असून एकही गडी गमावलेला नाही.