नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज! कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
![Neeraj Chopra ready to make history! When and where can you watch the match?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Neeraj-Chopra-780x470.jpg)
Neeraj Chopra | नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजला ब गटात ठेवण्यात आले होते. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून फायनलचे तिकिट मिळवले. चोप्राचा अंतिम सामना आज ८ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११:५५ वाजता खेलला जाईल.
नीरज चोप्रा आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी भालाफेक करेल. यासाठी त्याला इतर ११ अव्वल स्पर्धकांशी स्पर्धा करावी लागणार आहे. पुढील क्रमाने आज खेळाडू भालाफेकीसाठी येतील. त्यात नीरज चोप्रा आठव्या स्थानावर आहे.
1.जेकब वादलेक (झेक)
2.अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा)
3.केशॉर्न वॉलकॉट (ट्रिनिनाड अँड टॉबेगो)
4.अर्शद नदीम (पाकिस्तान)
हेही वाचा – महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला काय? अजित पवार म्हणाले..
5.जुलियन वेबर (जर्मनी)
6.ज्युलियस येगो (केनिया)
7.लेस्सी एटलेटालो (फिनलँड)
8.नीरज चोप्रा (भारत)
9.अँड्रियन मार्डारे (मालदोवा)
10.ऑलिव्हर हेलँडर (फिनलँड)
11.लुईज मॉरिशियो दा सिल्व्हा (ब्राझील)
12.टोनी केरॅनेन (फिनलँड)
कुठे पाहता येणार सामना?
भालाफेकीचा अंतिम सामना जिओ सिनेमावर Live प्रक्षेपण केला जाणार आहे. त्याशिवाय, स्पोर्ट्स १८ नेटवर्क चॅनलवरदेखील या सामन्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.