Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

“मी अखेरचा सामना गेल्यावर्षी…”, विराट कोहलीचं मॅचविनिंग खेळीनंतर मोठं वक्तव्य; RCBच्या विजयानंतर काय म्हणाला?

Virat Kohli on RCB Win IPL 2026: विराट कोहलीने आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात मॅचविनिंग खेळीनंतर त्याच्या फॉर्मबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विराटने पहिल्याच सामन्याच चेसमास्टरचं रूप धारण करत संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. आरसीबीने २०२ धावांचं लक्ष्य गाठताना विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या खेळीच्या बळावर अवघ्या १५.६ षटकांत दणदणीत विजय मिळवला.

विराट कोहलीने जानेवारीपासून एकही क्रिकेट सामना खेळलेला नसतानाही त्याचा या सामन्यातील फॉर्म कमालीचा ठरला. विराटसाठी वनडे मालिकेतील कामगरी त्याचा फॉर्म कायम राखण्यात मदत करणारी ठरली. विराटने आरसीबीच्या सलामीच्या सामन्यात ३८ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली.

विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला, “पुन्हा मैदानात उतरणं नेहमीच आनंददायी असतं. तुम्ही टी-२० क्रिकेटबद्दल म्हणालात तर, मी शेवटचा सामना गेल्या वर्षी फायनलमध्ये खेळलो होतो. पण अलीकडेच वनडे मालिकेत मी ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे तीच लय कायम ठेवायला मला मदत झाली. मी माझ्या नेहमीच्या शैलीबाहेरचे फटके खेळत नव्हतो. त्यामुळे मला माहिती होतं की जोपर्यंत मी लयीत आहे आणि फिटनेसवर मी पुरेसं काम केलं आहे, तर सगळं छान जुळून येईल. आजचा दिवस दमदार सुरुवात करत पुढे प्रगती करण्याची आणखी एक संधी होती.”

हेही वाचा –  उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याच्या या समस्यापासून मिळेल आराम

किंग कोहली फक्त वनडे क्रिकेट खेळत असल्याने त्याला आयपीएल आणि २०२५ मधील वनडे मालिकेनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या मोठ्या ब्रेकबाबत बोलताना विराट पुढे म्हणाला, “गेल्या १५ वर्षांत आम्ही ज्या प्रकारचं शेड्युल अनुभवलं आणि मी जितकं क्रिकेट खेळलो, त्यात थकवा येण्याचा धोका जास्त होता. त्यामुळे असे ब्रेक्स मला मानसिकदृष्ट्या खूप मदत करतात. मी ताजातवाना राहतो, उत्साही राहतो. जेव्हा मी पुन्हा खेळायला येतो, तेव्हा १२० टक्के तयारीनेच येतो. अतिरिक्त विश्रांतीमुळे मी मानसिकदृष्ट्या अधिक फ्रेश होतो. शारीरिक फिटनेस आणि मानसिक उत्साह या दोन्ही गोष्टी जुळल्या की तुम्ही संघासाठी चांगलं योगदान देऊ शकता. खेळाडू म्हणून फक्त जागा टिकवून ठेवायची नसते, तर सातत्याने कामगिरी करून संघासाठी योगदान द्यायचं असतं.”

पडिक्कलच्या खेळीबद्दल बोलताना कोहली म्हणाला, “त्याची खेळी जबरदस्त होती. सुरुवातीपासूनच पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळण्याचा माझा प्लॅन होता. पण त्याला खेळताना पाहिल्यावर मी त्यालाच स्ट्राइक देण्याचा निर्णय घेतला आणि मधूनच एखादा चौकार लगावला. त्याने एकहाती सामना प्रतिस्पर्ध्यांकढून खेचून घेतला. स्लोअर बॉलवर त्याने मिड-ऑनच्या वर मारलेला षटकार अप्रतिम होता. त्या क्षणी मी त्याला सांगितलं, ‘तू जसा खेळतोयस तसाच खेळत राहा.’ जर आपण २५-२६ चेंडू आधी सामना जिंकलो, तर नेट रनरेटलाही फायदा होईल.”

पड्डिकलबद्दल कोहली पुढे म्हणाला, “मी त्याला जवळून पाहिलं आहे. त्याच्याकडे अफाट कौशल्य आहे आणि आता तो ते उत्तम प्रकारे वापरत आहे. उत्कृष्ट देशांतर्गत रेड-बॉल हंगामानंतर तो अधिक आत्मविश्वासाने खेळतोय. त्याचं टाइमिंग, हेड पोजिशन, बॅलन्स सगळं वर्ल्ड-क्लास आहे. आत्मविश्वासात असताना तो बॅटने काय करू शकतो हे मला माहित आहे आणि आज त्याने त्याच्या टॅलेंटचं शानदार प्रदर्शन केलं.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button