Breaking-newsक्रिडा

#Lockdown:लॉकडाऊनमुळे मिळालेला सक्तीचा ब्रेक क्रिकेट खेळाडूंचं करिअर वाढवू शकतो : पीटरसन

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मागील जवळपास तीन महिन्यांपासून आंतराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू केल्यामुळे अनेक क्रिकेटर्स घरांमध्ये कैद आहेत. दरम्यान, इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन याला असं वाटतं की, ‘लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या ब्रेकमुळे काही खेळाडूंचं करिअर वाढू शकतं. दरम्यान, 13 मार्च रोजी शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता.

पीटरसनने एक ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘मला असं वाटतं की, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या ब्रेकमुळे अनेक महिला आणि पुरुष खेळाडूंचे करिअर वाढलं आहे. दबावामुळे मिळालेली मानसिक सुट्टी पुन्हा खेळावरील त्यांचं प्रेम वाढवण्यासाठी मदत करणार आहे आणि हे पाहण खरचं औत्सुक्याचं ठरणार आहे.’

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button