जूनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांश ठरला नॅशनल चॅम्पियन
![Junior world champion shooter Rudransh became the national champion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-09-30-at-7.00.42-PM-780x470.jpeg)
राष्ट्रीय खेळाडू आर्या सहाव्या स्थानावर
-महाराष्ट्राला उघडून दिले सुवर्णपदकाचे खाते
-पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल मध्ये सुवर्णपदक
अहमदाबाद : ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने शुक्रवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांशने फायनल मध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी ठरला. राष्ट्रीय नेमबाज आर्या बोरसेने महिलांच्या १० मीटर एअर रायफल गटामध्ये सहावे स्थान पटकावले. तिचा पदक जिंकण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.
महाराष्ट्र संघाचा युवा नेमबाज रुद्रांश पाटील पात्रता फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर फायनल गाठली होती. यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम कामगिरीमुळे तो या गटामध्ये किताबाचा दावेदार मानला जात होता. हाच विश्वास सार्थकी लावत त्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आगामी कैरो येथील आयोजित व चॅम्पियनशिपमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यातून त्याला आपली लय कायम ठेवत नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदकाचा यशस्वीपणे वेध घेता आला.
रुद्रांशची कामगिरी कौतुकास्पद
महाराष्ट्राचा युवा नंबर रुद्रांश पाटील फायनल मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याने याच सुवर्णपदकातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातून महाराष्ट्राच्या नावे पहिल्या सुवर्णपदकाची नोंद झाली. त्याचीही कामगिरी निश्चितपणे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांनी रुद्रांश याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
रुद्रांशचे सोनेरी यश अभिमानास्पद
महाराष्ट्र संघातील आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांश पाटील याने सुवर्णपदक जिंकण्याची केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. त्याचेही यश खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सोनेरी यशाची कामगिरी करत तो स्वतःची क्षमता सिद्ध करत आहे. दर्जेदार नेमबाज म्हणून आज त्याने आपला ठसा उमटवला, अशा शब्दात संघटनेच्या जनरल सेक्रेटरी शीला यांनी रुद्राक्ष खास कौतुक केले.
प्रचंड मेहनत करून सुवर्णवेध : कोच पाटील
महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्रांश पाटील यांनी नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत केली. या स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने सर्वोत्तम परफॉर्मन्स केला. त्यामुळे त्याला सोनेरी यश संपादन करता आले, अशा शब्दात प्रशिक्षक अजित पाटील यांनी रुद्रांशचे खास कौतुक केले