Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याआधी डिविलियर्सने सांगितली मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू, कुठल्या खेळाडूच्या क्षमतेवर व्यक्त केली शंका?

IPL 2026 : दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सच्या टीमबद्दल आपलं मत मांडलं आहे. डिविलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळायचा. एबी डिविलियर्सनच्या मते यंदाच्या सीजनसाठी मुंबई इंडियन्सची टीम उत्तम आहे. पण एका खेळाडूबद्दल त्याने शंका व्यक्त केली आहे. या खेळाडूच्या प्रदर्शनाबद्दल डिविलियर्सच्या मनात संशय आहे. ट्रेंट बोल्ट बद्दल डिविलियर्सने शंका व्यक्त केली आहे. डिविलियर्सच्या मते ट्रेंट बोल्ट हा पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय आहे. क्रिकेटच्या प्रत्येक विभागातील उत्तम जागतिक दर्जाचे खेळाडू असलेला मुंबई इंडियन्सकडे मजबूत संघ आहे असं डिविलियर्सने म्हटलय. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव सारखे दर्जेदार भारतीय खेळाडू या टीममध्ये आहेत. पण काही कमकुवत बाजू सुद्धा आहेत. त्याचा प्रतिस्पर्धी संघ फायदा उचलू शकतो असं डिविलियर्सला वाटतं.

आयपीएलचा 19 वा सीजन उद्यापासून सुरु होत आहे. मुंबई इंडियन्ससाठी फिरकी गोलंदाजी एक चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आता तितका भेदक वाटत नाही, जशी तो आधी गोलंदाजी करायचा. याचा मुंबई इंडियन्सला फटका बसू शकतो असं एबी डिविलियर्सने म्हटलं आहे. अभिनव मुकुंदसह डिविलियर्सने आयपीएलच्या आगामी सीजनचं विश्लेषण केलं. डिविलियर्सच्या मते, बोल्टच्या गोलंदाजीतील वेगाची धार आता कमी झाली आहे. त्यामुळे तो पावरप्ले आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये तितका घातक वाटत नाही.

हेही वाचा –  स्नायूंची ताकद, शरीराची लवचिकता वाढवण्याचा दिवस, वर्कआऊट जाणून घ्या

“माझ्यासाठी ट्रेंट बोल्ट एक चिंतेचा विषय आहे. भुवनेश्वर कुमार सारखी त्याची स्थिती आहे. 2018, 2019 आणि 2020 मध्ये तो जितका घातक वाटायचा तसा आता वाटत नाही” असं डिविलियर्स म्हणाला. “ट्रेंट बोल्ट 140 किमीच्या वेगाने गोलंदाजी करताना स्विंग करायचा. मी त्याला SA20 मध्ये खेळताना बघितलं, मला तो महागडा गोलंदाज वाटला” असं डिविलियर्सने म्हटलं.

ट्रेंट बोल्ड दक्षिण आफ्रिकेतील टी20 लीगमध्ये मुंबई केप टाऊन टीमकडून खेळला. 10 सामन्यात त्याने फक्त 8 विकेट काढल्या. बोल्टच्या गोलंदाजीतील विकेट काढण्याची जादू कुठेतरी हरवलीय असं वाटतय. या टुर्नामेंटमध्ये त्याने 9.82 च्या सरासरीने गोलंदाजी केली. बोल्टच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे विकेट काढता आल्या नाहीत तरी तो धावा रोखून ठेवायचा. पण हीच जादू आता त्याच्या गोलंदाजीत दिसत नाहीय.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button