Breaking-newsक्रिडा
IPL 2018 : हैदराबादचा पाच धावांनी विजय…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/srh-.jpg)
हैदराबाद – केन विल्यमसनची कर्णधाराला साजेशी खेळी आणि शकिब अल हसनच्या साथीत त्याने रचलेली बहुमोल भागीदारी यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 39 व्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघासमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान ठेवता होते. परंतु बंगळुर संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. हैदराबाद संघाने पाच धावांनी बंगळुर संघावर विजय मिळविला आहे.
नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाचा डाव बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 146 धावांवर रोखला होता.
या महत्वपूर्ण विजयासह हैदराबाद संघाचे 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थान कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघाने 20 षटकात 6 गाडी बाद 141 धावा बनविल्या होत्या. अशाप्रकारे हैदराबाद संघाने पाच धावांनी बंगळुर संघावर विजय मिळविला आहे.