INDvsAUS दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा धमाकेदार विजय
![INDvsAUS India's landslide victory in the second T20 match](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/media-handler.jpg)
सिडनी – पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यावर वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामनाही जिंकला आहे. भारताला एकदिवसीय मालिका १-२ अशी गमवावी लागली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभवाची परतफेड करत भारताने मालिका २-०ने जिंकली आहे. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करावी लागली.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तर आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने २-० अशी कामगिरी केली आहे..
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेतली असून त्यात आता कर्णधार एरोन फिंचच्या दुखापतीची भर पडली आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्याने आजच्या सामन्यात फिंचच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. तर मागील सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या डोक्याला चेंडू आदळल्यामुळे त्याच्या जागी यजुर्वेद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने गोलंदाजीत आपली छाप पाडत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विजयी संघात कोणतेही बदल न करण्याचे संकेत दिले आहेत.