Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारताच्या लेकींचा जलवा; आशिया चषक रायझिंग स्टार्स जेतेपद पटकावलं

Womens Rising Stars Asia Cup | राधा यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या अ महिला संघाने महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात टीम इंडियाने बांगलादेश अ संघावर ४६ धावांनी मात करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात ढासळलेली होती. अवघ्या ४४ धावांत चार विकेट्स गमावल्यानंतर तेजल हसबनीस आणि कर्णधार राधा यादव यांनी डाव सावरला. दोघींनी ५० चेंडूत ६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तेजल हसबनीसने ३४ चेंडूत ५१ धावा केल्या, तर राधा यादवने ३० चेंडूत ३६ धावांचं योगदान दिलं. वृंदा दिनेशने १९ धावा जोडल्या. यामुळे भारताने २० षटकांत ७ बाद १३४ धावा केल्या.

हेही वाचा      :                अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? विजय वडेट्टीवारांचा सवाल

१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश अ संघावर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून दबाव ठेवला. सायमा ठाकोर आणि प्रेमा रावत यांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना धक्के दिले. प्रेमा रावतने ३ विकेट्स घेतल्या, तर सोनिया मेंदिया आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय सायमा ठाकोर, मिन्नू मणी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

बांगलादेशकडून शमिमा सुल्ताना हिने २० धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. अखेर बांगलादेश अ संघ ८८ धावांत सर्वबाद झाला आणि भारताने ४६ धावांनी विजय मिळवला.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात युएईविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर भारत अ संघाने दमदार पुनरागमन करत थेट विजेतेपद पटकावलं. कर्णधार राधा यादवच्या नेतृत्वाखाली संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर स्पर्धा जिंकत आशियात आपलं वर्चस्व पुन्हा अधोरेखित केलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button