पॅरालिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! २९ पदकांवर कोरले नाव
![India's historic performance in the Paralympics! Name engraved on 29 medals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Paralympics-2024-780x470.jpg)
Paralympics 2024 | पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत ऐतिहासिक २९ पदकांवर नाव कोरले. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह भारतीय खेळाडूंनी विक्रमी पदके आपल्या नावे केली. शनिवारी भारतीय खेळाडूंनी २ पदके जिंकण्याची कामगिरी केली. एकूण २९ पदकांसह भारताने १८वा क्रमांक पटकावला.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक १९ पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. मात्र हा विक्रम यंदा भारतीय खेळाडूंनी मोडीत काढला. पॅरिसमध्ये भारताचे एकूण ८४ पॅरा खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात २९ पदकांवर भारतीय खेळाडूंना मोहोर उमटवता आली. भारताला सर्वाधिक १७ पदके ॲथलेटिक्समध्ये जिंकता आली. त्यापाठोपाठ बॅडमिंटनमध्ये ५ पदके, तर नेमबाजीत ४ पदके भारताच्या नावावर झालीत. तिरंदाजीत भारताने दोन पदकांवर ठसा उमटला. ज्युदोमध्ये भारताने पहिलेवहिले आणि एकमेव पदक जिंकले.
हेही वाचा – अमित शाहांच्या वक्तव्यावर आम्ही हसतोय; संजय राऊतांचा खोचक टोला
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते
- अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
- मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
- निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
- योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
- नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
- मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
- तुलसीमती मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
- सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
- शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
- सुमित अंतिल (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
- नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
- दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
- मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
- शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
- अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
- सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
- सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F46)
- हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
- धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
- प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)
- कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष 60 किलो (जे1)
- प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)
- होकाटो होतोजे सेमा (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट (F57)
- सिमरन शर्मा (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 200 मीटर (T12)
- नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F41)