World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी?
![Indian team announced for the World Cup, see who got a chance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/team-india-780x470.jpg)
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे.
कोणाचा पत्ता झाला कट?
विश्वचषकाच्या अंतिम १५ मध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या १५ जणांच्या या यादीत एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान मिळाले नाही.
हेही वाचा – राज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार; भारतीय हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज
🚨 NEWS 🚨
India’s squad for #CWC23 announced 🔽#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 5, 2023
काय आहे भारताचे संपूर्ण वेळापत्रक –
- ८ ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया – चेन्नई
- ११ ऑक्टोबर दिल्ली – अफगाणिस्थान
- १४ ऑक्टोबर अहमदाबाद – पाकिस्तान
- १९ ऑक्टोबर – पुणे – बांगलादेश
- २२ ऑक्टोबर – धर्मशाला – न्यूझीलंड
- २९ ऑक्टोबर – लखनौ – इंग्लंड
- २ नोव्हेंबर – मुंबई – श्रीलंका
- ५ नोव्हेंबर कोलकाता – दक्षिण आफ्रिका
- १२ नोव्हेंबर बेंगलोर – नेंदरलँड
विश्वचषकासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.